विजेचा आकडा कट करायला सांगितलेच्या कारणावरून एकास बेदम मारहाण
सार्वमत

विजेचा आकडा कट करायला सांगितलेच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

Arvind Arkhade

जामखेड|तालुका प्रतिनिधी|Jamkhed

जामखेड तालुक्यातील साकत येथील गोविंद जयसिंग चव्हाण यांनी वायरमनला विजेचा आकडा कट करण्यास सांगितल्याचा राग आल्याने तालुक्यातील साकत गावातील सात ते आठ जणांनी गोविंद चव्हाण यांना दि. 4 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साकत गावातील बसस्थानक परिसरात फोन करून बोलावून घेत गज काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी चव्हाण यांना काळ्या रंगाच्या एमएच 12 सी. के. 5776 या सफारी गाडीत बसवून साकत शिवारातील पवन चक्कीजवळ घेऊन गेले व कोयत्याचा धाक दाखवत तू जर पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी देत मारहाण केली या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असुन एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

गोविंद चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनुसार साकत गावातील दिपक विजय घोडेस्वार, रमेश विजय घोडेस्वार, रवी बळी घोडेस्वार, दादा मारुती घोडेस्वर ,विकी पुलवळे, कैलास पुलवळे, पप्पू रावसाहेब पुलवळे या सात जणांविरोधात कलम 363, 326, 325, 324, 323 सह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात जामखेड पोलिसांनी रमेश घोडेस्वार व रवी घोडेस्वार या दोन आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस उपधीक्षक अधिकारी संजय सातव व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी भेट दिली व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीची पाहणी केली पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाबासाहेब बडे हे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com