जामखेड : किराणा किटचे वाटप

 जामखेड : किराणा किटचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी) - उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्वयम शिक्षण प्रयोग, जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील सातेफळ, नागोबाचीवाडी, मतेवाडी, राजेवाडी, बावी आणि धानोरा गावात अपंग, निराधार, भूमिहीन, विधवा, गरजू लोकांना धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या पुढाकारातून प्रत्येक गावातील 10 लोकांची निवड करून त्यांना मदत केली.

यावेळी राज्य अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, जिल्हा व्यवस्थापक अजय आव्हाड, तालुका व्यवस्थापक स्वप्नाली तोडमल, स्वप्नील निहालकर, प्रभाग समन्वयक हरिबा चांदगावे, गोकुळ जायभाय तसेच स्वयंम शिक्षण प्रयोगचे तालुका समन्वयक नवनाथ वाघमोडे, शीला भोजने व गावचे ग्रामसेवक फरतडे, सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

प्रास्ताविक नवनाथ वाघमोडे यांनी केले तर आभार शीला भोजने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीआरपी ताई शिंदे, लीडर सुलताना शेख, दमयंती थोरात यांनी सहकार्य केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com