जामखेडचा सराईत गवसणे दोन वर्षांसाठी स्थानबद्ध

नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी
जामखेडचा सराईत गवसणे दोन वर्षांसाठी स्थानबद्ध

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड पोलीस स्टेशनला भादंवी 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला तसेच भाजपचे आ. राम शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारा जामखेडचा सराईत गुन्हेगार सागर गवसणे (38) यावर दोन वर्षाची स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायद्यान्वये दोन वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील रहिवासी सराईत गुन्हेगार सागर सुभाष गवसणे उर्फ सागर मराठा वय 38 वर्षे, याने मागील काळात वारंवार व सराईतपणे अनेक गुन्हे करून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था बाधित केलेली आहे. त्याने खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने व अग्निशस्त्रांसह मारहाण करणे, खंडणी उकळणे, समाजामध्ये पोलीस दलाविषयी अप्रितीची भावना चेतविणे अशा स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. सागर गवसणे याने मागील काही दिवसांपूर्वी फेसबुक या समाज माध्यमाव्दारे विधान परिषद सदस्य, आ. राम शिंदे यांना जाहीरपणे जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com