जामखेडला सलग दुसर्‍या दिवशी सावकारकीचा गुन्हा

पोलिसांची कारवाई गतिमान
जामखेडला सलग दुसर्‍या दिवशी सावकारकीचा गुन्हा
चोरी

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

खासगी सावकाराकडू घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचे पैसे वेळोवेळी देऊनही जबरदस्तीने टि. व्ही घेऊनही खाजगी सावकाराचा त्रास थांबत नसल्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका माजी नगरसेवकावर सावकारकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सावकारांचे धाबे दणाणले असून जामखेड पोलिसांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

दीपक अशोक चव्हाण (रा. रा. धर्मयोद्धा चौक, तपनेश्वर रोड, जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी गणेश अभिमान भनवसे (रा. रसाळनगर, नगर रोड, जामखेड) याने दरमहा 40 रुपये टक्के दराने 1 लाख 30 हजार रुपये कर्ज घेतले होते. दिलेल्या पैश्याचे व्याजाचे हफ्ते रोख रक्कम समक्ष व मोबाईल वरील फोन पे या अ‍ॅप्लिकेशन द्वारे घेतले.

तसेच बळजबरीने भनवसे यास टीव्हीच्या दुकानात घेऊन जाऊन, व्याजापोटी 46,990 रुपये किमतीचा टी.व्ही. घेतला. तसेच घरात बळजबरीने घुसून कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार चव्हाण याच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करत आहेत.

Related Stories

No stories found.