दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून

दोन तासात जामखेड पोलीसांनी संशयित केला गजाआड
दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून उचलून डांबरीवर आपटल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील आपटी येथे आज सकाळी घडली. जामखेड पोलीसांनी गुन्ह्याची सुत्रे गतीने फिरवत अवघ्या दोन तासात संशयितांना गजाआड करण्याची कामगिरी केली.

छगन बबन गोरे (रा. आपटी) असे या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर बाबासाहेब महादेव जगदाळे (वय 65, रा. आपटी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आपटी गावातील पिंपळगाव रोडवरील बसस्थानकाजवळ असणार्‍या राम गोरे यांच्या दुकानासमोर हा प्रकार घडला. छबन गोरे हा बाबासाहेब जगदाळे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु आपल्याकडे पैसे नसल्याचे जगाळे यांनी सांगताच याचा राग आल्याने गोरे याने जगदाळे यांना उचलून डांबरी रस्त्यावर आपटले.

काही लोक त्यांना सोडवण्यासाठी धावले परंतु तो पर्येंत गोरे याने दुसर्‍यांदा जगदाळे यांना उचलून डांबरीवर आपटले. यात जगदाळे यांच्या डोक्याला वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तेथील नागरीकांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले पंरतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. या प्रकरणी जगदाळे यांचे जावई देवरथ गंगाराम मिसाळ (रा.आपटी) यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद आहे. या प्रकाराची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन सुचना केल्या.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चार पथके तैनात करून संशयिताचा तपास सुरू केला. एका पथकाने घटनेनंतर अवघ्या 2 तासात संशयित छबन बबन गोरे यास तालुक्यातील नान्नज येथून ताब्यात घेतजले. गोरे यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक सुनील बडे, उपनिरिक्षक राजू थोरात, कर्मचारी शेंडे, अविनाश ढेरे, पोलीस नाईक जाधव, म्हस्के, पवार, पोशि आवारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अधिक तपास सहायक निरिक्षक सुनील बडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.