जामखेड तालुक्यात करोनाने मुख्याध्यापकाचा मृत्यू
सार्वमत

जामखेड तालुक्यात करोनाने मुख्याध्यापकाचा मृत्यू

Arvind Arkhade

जामखेड|तालुका प्रतिनिधी| jamkhed

जामखेड तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा आज सकाळी करोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयमध्ये उपचार सुरू होते. जामखेड तालुक्यात आतापर्यंत करोनाने नऊ बळी घेतले आहेत.

जामखेड तालुक्यातील करोनाचा कहर थांबता थांबेना आज शनिवार दि. 8 ऑगस्ट रोजी पहाटे जामखेड तालुक्यातील पाडळी येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्या रुग्णांला सहा दिवसांपासून श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी जामखेड येथे करोनाची तपासणी करून घेतली. या तपासणीमध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना नगर येथील हॉस्पिटलमध्ये मागिल रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर त्यांचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com