आ. रोहित पवारांचा भाजपला धक्का

आ. रोहित पवारांचा भाजपला धक्का
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

जामखेड मतदार संघातून (Jamkhed constituency) निवडून आल्यानंतर आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली. सत्तास्थाने खेचून आणण्यासाठी त्यांनी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले. कर्जतमध्ये (Karjat) राष्ट्रवादीची (NCP) चलती सुरू झाल्याने भाजपातील (BJP) अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

कर्जतमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी आ. पवार (MLA Rohit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे जिल्हा संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक लालासाहेब शेळके तसेच नितीन तोरडमल, कर्जत सोसायटीचे व्हाईस चेअरमन देविदास खरात यांनी आ. पवार यांच्या उपस्थितीतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे कर्जत शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

यावेळी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे, कुंभेफळचे सरपंच संतोष नलवडे उपस्थित होते. आ.पवार यांच्या माध्यमातून कर्जत शहरात शहराचा कायापालट होत होत आहे. त्यांच्या या विकासाच्या वाटेला साथ देण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगरपंचायतीच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com