जामखेड : चौंडीत चुलता-पुतण्या नदीच्या पाण्यात गेले वाहुन

जामखेड तहसीलदार व पोलिस निरीक्षक चौंडीत तळ ठोकून
जामखेड : चौंडीत चुलता-पुतण्या नदीच्या पाण्यात गेले वाहुन

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील चौंडी येथील सीना नदीतील बंधार्‍यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेले.

पाण्याचा प्रवाह जादा आसल्याने मदतकार्यात अडथळे येत आसुन घटनास्थळी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे तळ ठोकून आहेत.

जामखेड तालुक्यात सध्या मागिल अठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आसल्याने तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसांडून वहात आहेत. चौडीं येथील सीना नदीला देखील पुर आला आसुन येथील के टी वेअर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे.

आज दि 13 रोजी सायंकाळी येथे राहणारा पुतण्या तुषार गुलाबराव सोनवणे वय 22 त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे वय 43 व इतर एक आसे तीघे जण मासे पकडण्यासाठी बंधार्‍यावर गेले होते. चुलते पुतणे हे या केटीवेअर बंधार्‍याच्या खालच्या बाजूला मासे पकडत होते तर तीसरा हा बंधार्‍याच्या बाजुला बसला होता.

याच दरम्यान पाण्याचा वेग जादा आल्याने या मध्ये चुलता व पुतण्या हे पाण्यात पडुन वाहुन गेले. ही घटना बाजुला उभ्या आसलेल्या दुसर्या मुलाने गावात जाऊन सांगितली यानंतर सदर ची घटना लक्षात आली.

घटनेची माहिती समजताच तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी चौंडी येथे पोहोचले. यानंतर रात्री अंधार आसल्याने शोधकार्यात अडथळे येत आहे सध्या या ठिकाणी जनरेटरच्या लाईट द्वारे शोधमोहीम सुरू आसुन रात्री उशिरा पर्यंत या दोघांचा शोध लागला नाही अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com