जामखेडमध्ये मोटारसायकल चोरी करणार्‍या पाच जणांना अटक

जामखेडमध्ये मोटारसायकल चोरी करणार्‍या पाच जणांना अटक
जामखेड

जामखेड|तालुका प्रतिनिधी|Jamkhed

जामखेड तालुक्यातील जामखेड शहर व खर्डा परिसरातून मोटारसायकल चोरी करणार्‍या पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरीस गेलेल्या पाच मोटरसायकल पोलीस कारवाईत हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की जामखेड पोलिसांनी खर्डा व आंबी, तालुका भूम शिवारात सापाळा लावून चोरांना पकडून 5 मोटरसायकल चोरांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले ईश्वर सुरेश काळे रा. खर्डा, आकाश शिवाजी पवार रा. खर्डा, प्रदीप चंद्रकांत काळे रा. सदाफुले वस्ती जामखेड, राहुल लाला शिंदे व प्रशांत श्रीकांत शिंदे दोन्ही रा.कमळेश्वर पिंपळगाव, ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद या आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा लावून त्यांना खर्डा ता. जामखेड व आंबी ता.भूम शिवारात पकडून ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com