गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - आ. तनपुरे

गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - आ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने महिलांसह शेकडो आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

आ. तनपुरे म्हणाले, शांततेच्या मार्गाने अंतरवली येथे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला पूर्वनियोजित आहे. जवळच्या जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा कार्यक्रम असल्याने 2 हजार पोलीस फोर्स पाचारण करून हे आंदोलन चिरडण्याचा डाव सरकारचा होता.

शेतकर्‍यांना कर्जमाफी, अवकाळी, अतिवृष्टीची अद्याप मदत मिळाली नाही. सरकार फक्त राज्यात जातीयवाद निर्माण करून आपली राजकिय पोळी भाजण्यात व आपली सत्ता राखण्यात व्यस्त असून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचे आ. तनपुरे यांनी म्हटले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com