
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यासाठी 30 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत भानगाव येथे 1 कोटी 16 लाख रूपयेे व तांदळी दुमाला येथे 2 कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यात विकास कामे जोरात चालू असून आतापर्यंत तालुक्यासाठी 200 कोटीं पेक्षा जास्त निधी रस्ते, आरोग्य, बंधारे, वनविभाग, पाटबंधारे विभाग अशा विविध विभागासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजनांमधून मिळवून दिला आहे. यामुळे काहींचा पोटसूळ उठला असून ते जनतेची दिशाभूल करत आहेत.