ग्रामपंचायतवर  मर्जीतला प्रशासक म्हणजे घटनाद्रोह - जालिंदर वाकचौरे
सार्वमत

ग्रामपंचायतवर मर्जीतला प्रशासक म्हणजे घटनाद्रोह - जालिंदर वाकचौरे

प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

वीरगाव (वार्ताहर) - महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या आणि निवडणूकीस पात्र ग्रामपंचायतींवर राज्यशासनाने प्रशासक नियुक्तीचे धोरण आखले आहे. प्रशासक नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्याच्या सल्ल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत.

प्रशासक पदावर आता सत्तेतील स्वपक्षीय कार्यकर्त्यांची वर्णी लागणार असून हा प्रकार भारतीय संविधान विरोधात घटनाद्रोह असल्याचा आरोप भाजपाचे जि.प.सदस्य आणि गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com