जलयुक्त शिवार भ्रष्टाचार; ‘या’ तीन अधिकार्‍यांना अटक

जलयुक्त शिवार भ्रष्टाचार; ‘या’ तीन अधिकार्‍यांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी)

सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्‍यांना आज अटक केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे अशी अटक केलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत.

दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही गुन्ह्यात पाच आरोपी आहेत. यातील तिघांना अटक केली असून तत्कालीन वनसंरक्षक रमेश गोविंद गोलाकर व एक महिला वनपाल पल्लवी सुरेश जगताप पसार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com