जल जीवन मिशन अंतर्गत पारनेरला 38 कोटींचा निधी - आ. लंके

कान्हुर पठारसह 16 गावांना लाभ
आमदार निलेश लंके
आमदार निलेश लंके

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जल जीवन मिशन अंतर्गत पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार सह 16 गावांसाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी तत्कालीन राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार, तत्कालीन ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कान्हुर पठार सह 16 गावच्या पाणी योजनेसाठी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनेचे जॅक वेलसह पंपहाऊस योजनेतील अनेक गावांत वाढीव साठवण पाण्याच्या टाक्या योजनेतील पाईपलाईन दुरुस्ती वीज बिल यांच्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी वितरण व्यवस्था हा निधी देण्यात आलेला आहे.

थकित वीज बिलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कान्हुर पठारसह 16 गावची ही पाणी योजना बंद अवस्थेत आहे. मांड ओहोळ धरणावरून असलेल्या कान्हुर पठारसह 16 गावांतील ग्रामस्थांकडून ही योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com