जलजिवन मिशन पाणी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत - ना. तनपुरे

जलजिवन मिशन पाणी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत - ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शासनाची जलजीवन मिशन पाणी योजना (Jal Jeevan Mission) ही महत्वकांक्षी योजना असून गावातील शेवटच्या घटकापर्यंत पाणी देण्याची प्रयत्न असून त्या दृष्टीने तालुक्यातील 14 गावांचा आढावा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकित (Review Meeting) घेतला असून यासाठी सर्वे सुरु झाला असून सरपंच ग्रामसेवक (Sarpanch, Gramsevak) यांच्या कडून अडचणी जाणून घेतल्या.

ना. प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी शासनाच्या जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत तालुक्यातील बैठकीस पुरवठा योजनेत तालुक्यातील 14 गावांचा पाणी योजनेचा सर्वे सुरु असून त्याबाबत गावाचे सरपंच अधिकारी नागरिक ह्यांनी बसून त्याबाबतच्या अडचणी समजून घेण्यासाठी आज पंचायत समितीच्या सभागृहात अडचणी समजून मार्गदर्शन केले. तालुक्यातील प्रादेशिक पाणी योजनेत (Regional water Schemes) गावे वगळता जी 14 गावे आहेत. त्यातील ब्राह्मणगाव भांड, चांदेगांव, चिखलठाण, चिंचोली, जांभळी, करजगाव, कोळेवाडी, कुरणवाडी म्हैसगाव, कोल्हार खुर्द, सात्रळ, तांभेरे, वावरथ, टाकळीमिया या राहुरी (Rahuri) नगर पाथर्डी (Nagar Pathardi) व श्रीरामपूर मतदार संघातील (Shrirampur constituency) तालुक्यातील 32 गावांसह जी गावे येतात त्यां गावातील प्रत्येक माणसाला शेवटच्या घटका पर्यंत 2024 पर्यंत पाणी देण्याची केंद्र व राज्य सरकार (Central and State Governments) यांची एकत्रित योजना असून यासाठी भरपुर प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे.

येणार्‍या या निधीचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा यासाठी पंचायत समितीचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता सर्वे करण्यासाठी येणार आहे. त्यांना त्याबाबतीत योग्य ते सहकार्य करून ज्या अडी अडचणी आहेत त्या मांडव्यात, असे आवाहन ना. तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी केले. सदरचा निधी प्रत्येक गावासाठी चालू आर्थिक वर्षातच उपलब्ध होऊन त्या कामाचे टेंडर सुद्धा निघणार असून प्रत्येक गावाने व्यवस्थित नियोजन करावे.

ना. तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) म्हणाले, शासनाच्या या जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) संदर्भात आता पर्यंत 4 ते 5 बैठका घेतल्या असून तालुक्यातील ज्या पाणी योजना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत (Regional Water Supply Scheme) समाविष्ट आहेत, त्या सोडून म्हणजे बारागाव नांदूर सह 14 गावे, कुरणवाडी सह 17 गावे, मुसळवाडी सह 9 गावे दवणगाव सह गावे तसेच ब्राह्मणीसह 6 गावे व वांबोरीसाठी स्वतंत्र पाणी योजनेचा प्रस्ताव असून त्याचा सर्वे सुरु आहे.या व्यतिरिक्त ज्या गावांचा या योजनेत समाविष्ट नाही, त्यांचा सर्वे सुरु आहे. तालुक्यातील मुळाधरणा नजिकची वावरथ, जांभळी, शेरी, चिखलठाण सह काही गावे ही आदिवासी पट्ट्यातील असून त्यांना पाण्याचा उद्भभव असल्याने तिथे पाण्याचा स्तोत शास्वत असल्याने अडचण नाही, पण तालुक्यातील तांभेरे येथील नागरिकांच्या पाण्याबाबत कायम असणार्‍या तक्रारी लक्षात घेऊन सर्वे करण्यात यावा.

राज्यातील ज्या गावांच्या पाणी योजनाचे बिल थकीत असेल, त्या पाणी योजनाचे विजेचा पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय राज्याचे कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय झालेला असल्याने तालुक्यातील खडांबे खुर्द व बुद्रुक, धामोरी खुर्द व बुद्रुक, वरवंडी बाभुळगाव या 6 गावांचा गेल्या 10 ते 12 दिवसा पासून पाणी पुरवठा बंद आहे. तो सुरु करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता महावितरण यांना भ्रमणध्वनी द्वारे दिल्या.

या बैठकीत पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश निमसे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता एस . एस गडढे, शाखा अभियंता डी. व्ही परदेशी, प्रकाश पाटील, गणेश हारदे, रामदास बाचकर, डॉ जालिंदर घिगे, डॉ वारुळे, श्रीकांत बाचकर, प्रभाकर हरिश्चंद्रे, डॉ सुभाष काकडे, डॉ राजेंद्र बानकर, विष्णू निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे युवकांचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com