जखणगावला जुगार अड्ड्यावर छापा

सहा जुगारी पकडले || 76 हजारांचा मुद्देमाल जप्त
जखणगावला जुगार अड्ड्यावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जखणगाव (ता. नगर) शिवारातील महादेव मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 76 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी सायंकाळी नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखणगावला जुगार अड्ड्यावर छापा
नागापूर परिसरात युवकाचा मृतदेह आढळला

मुनीर मासूम शेख, कदीर मासूम शेख, नजीर मासूम शेख, अहमद उमराव शेख, कुंडलिक कोंडिबा देवकर (सर्व रा. जखणगाव), बाळासाहेब लक्ष्मण सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. जखणगावातील महादेव मंदिरामागे काही जण जुगार खेळत आहेत, अशी माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली.

जखणगावला जुगार अड्ड्यावर छापा
समृध्दी महामार्गावर बर्निंग कारचा थरार

त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता छापा टाकला. पकडल्यांकडून जुगाराचे साहित्य, दोन हजार 100 रूपये रोख आणि तीन दुचाकी असा 76 हजार 610 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार खेडकर, घोरपडे, राहुल शिंदे, भालसिंग, टकले यांनी ही करवाई केली.

जखणगावला जुगार अड्ड्यावर छापा
सोनईत घातवार : विजेच्या धक्क्याने मायलेकीसह तिघांचा मृत्यू

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com