जैनपूर शिवारात 27 ब्रास वाळूचा साठा जप्त

राज्य दक्षता व जिल्हा खनिज पथकांची कारवाई; दोन ट्रॅक्टरही जप्त
जैनपूर शिवारात 27 ब्रास वाळूचा साठा जप्त

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील जैनपूर शिवारात गोदावरी नदीपात्रात (Jainpur Godavari river) अनधीकृतपणे वाळू उपसा (Unauthorized sand extraction) करणारे दोन ट्रॅक्टर राज्यस्तरीय दक्षता पथक व जिल्हा खनिज पथकाने छापा (District Mineral Squad raid) टाकून ताब्यात घेतले असून याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घोगरगावचे पोलीस पाटील राहुल कैलास साठे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 14 जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राज्यस्तरीय दक्षता पथक व जिल्हा खनिज पथकाने नेवासा तालुक्यातील जैनपूर शिवारात गोदावरी नदीपात्रात जैनपूर वनविभागाच्या मालकीच्या शेत गट नं. 175 मध्ये छापा टाकला असता महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व विनाक्रमांची ट्रॉली त्यात एक ब्रास वाळू असलेला तसेच न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा विना नंबरचा ट्रॅक्टर व नंबर नसलेली ट्रॉली असलेला त्यात एक ब्रास वाळू मिळून आली.

तसेच शेत गट नं. 175 मध्ये साडेसत्तावीस ब्रास वाळूचा करुन ठेवलेला साठा मिळून आला.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी दोन अज्ञात ट्रॅक्टरचे चालक मालक तसेच साठा करून ठेवलेल्या अज्ञात व्यक्तीवर वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com