आ. रोहित पवारांचा जामखेडमध्ये भाजपला धक्का

जिल्हा बँक संचालक राळेभात यांच्या हाती घड्याळ
आ. रोहित पवारांचा जामखेडमध्ये भाजपला धक्का

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचे भाजप (BJP) पर्यायाने माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) व खा. विखे (MP Dr. Sujay Vikhe) यांना धक्के सुरूच आहेत. गेली अनेक वर्षांपासून विखे गटाचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात ((Former Director of District Bank Jagannath Ralebhat) यांचे चिरंजीव व विद्यमान संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Kajat-Jamkhed MLA Rohit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (NCP Entry) केला आहे.

पुणे येथील साखर संकुल या ठिकाणी आज (दि.5) दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत नुकतेच हतात घड्याळ बांधले. हा भाजपला एक धक्का असला तरी या प्रवेशाला आणखी एक बाजू असल्याचे बोलले जात आहे. अगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, भाजपचे होत असलेले खच्चीकरण तसेच नुकत्याच निवडणुक लागलेल्या जामखेड विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर अनेक वर्षांपासून संचालक अमोल राळेभात यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. मात्र या निवडणूकीत आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनल निवडणुकीत उतरल्याने व पवार यांचा झंझावात कर्जत नगरपंचायतीत दिसून आल्याने राळेभात बंधुंनी हा प्रवेश केल्याचे मानले जात आहे. एकंदर राळेभात यांच्या प्रवेशाने खा. विखेंसह माजीमंत्री प्रा. राम शिंदे व भाजपाला धक्का तर राष्ट्रवादी काँगेसला बळ मिळाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com