अहमदनगर l प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या जामखेड सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात

यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघातून त्यांच्यासह त्यांचे पुत्र अमोल राळेभात यांचाही अर्ज शिल्लक आहे. त्यामुळे पिता-पुत्रांपैकी कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे सुरेश भोसले यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

यावेळी जगन्नाथ राळेभात यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुधीर राळेभात यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उत आला. आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्ता आहोत. पण तालुक्यात आ. रोहीत पवार यांनी सुरू केलेली विकासकामे व अन्य कामांमुळे पवार यांचे नेतृत्व मान्य केल्याचे त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.