ठरलं..! नेवाश्यात "या" तारखेपासून कडक जनता कर्फ्यु
सार्वमत

ठरलं..! नेवाश्यात "या" तारखेपासून कडक जनता कर्फ्यु

करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक जनता कर्फ्यु

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

शहरात सुरू असलेल्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी नगरपंचायतीने नगरपंचायत प्रांगणात व्यावसायिक, नागरीक, राजकीय पदाधिकाऱी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शनिवार दि. ८ ते १५ ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, संजय सुखदान, नितीन दिनकर, सतिष पिंपळे, नितिन जगताप, विजय गांधी, लक्ष्मण जगताप, मनोज पारखे, अस्लम मनसुरी, बंडुशेठ सचदेव, राजेंद्र मुथ्था, इम्रान दारुवाले, जाकीर शेख, सतिष गायके, शिवा राजगीरे, निरंजन डहाळे, अजित नरुला, मुक्तार शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते, मात्र आता रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या बैठकी नंतर ४० रुग्ण वाढले. रोज शहरात करोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. काही व्यावसायिकांनी देखील करोनाची लागण झाली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक जनता कर्फ्यु आवश्यक आहे.

राजकीय जोडे बाजूला ठेवून जनता कर्फु करण्यात यावा. किराणा भाजीविक्री सुद्धा बंद करावी. फक्त मेडिकल , दवाखाने सुरु ठेवावे. जे दुकाने सुरु ठेवतील त्यांच्यावर कारवाई करा. १०० टक्के जनता कर्फु करण्यात यावा. या बैठकीस व्यावसायिक व नागरीक उपस्थित होते. नागरिकांना काम असेल तरच बाहेर पडा, तोंडाला मास्क लावा, नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. विनाकारण शहरात फिरणार्यावर व ज्या व्यावसायिक दुकाने सुरु ठेवतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असा निर्णय झाला. जनता कर्फ्यु १०० टक्के होण्यासाठी कमेटी लक्ष ठेवेल, तसेच नागरीकांनी देखील आपल्या जबाबदारीचे पालन करावे, असे बैठकीत ठरले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com