कर्जुले हर्या घाटात त्या शिक्षकाचा अपघात नव्हे तर खून

पोलीस तपासात घटना उघड, दोघांवर गुन्हा
कर्जुले हर्या घाटात त्या शिक्षकाचा अपघात नव्हे तर खून

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

कर्जुले हर्या जवळील घाटात 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पोलीस तपासात हा अपघात नसून त्यांच्या जवळ असलेले पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी करण्यात आलेला खून असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला जेरबंद करण्यात आले आहे.

कर्जुले हर्या घाटात त्या शिक्षकाचा अपघात नव्हे तर खून
महसुलमंत्री विखे पाटलांनी खा. राहुल गांधीना दिला हा सल्ला

दत्तात्रय सखाराम शिर्के (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एकजण अद्याप फरार आहे. तर रविंद्रकुमार बबनराव उदावंत (रा. वासुंदेरोड, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते अकोले तालुक्यातील रुंभोडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत होते. रविंद्रकुमार उदावंत हे वासुंदे येथील घरून आकोलेकडे जात असताना 7 नोव्हेंबरला त्यांचा अपघात झाला होता.

कर्जुले हर्या घाटात त्या शिक्षकाचा अपघात नव्हे तर खून
राहुरी तालुक्यात ऊसतोड बंद आंदोलन चिघळले

यासंदर्भात नरेंद्र दगडू केदार (रा. नवी मुंबई) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी बसमधून प्रवास करतांना हा अपघात घडवतांना पाहिला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पारनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक घनश्याम बळप यांना खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सखाराम शिर्के याने हा खून केला असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिर्के यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली आहे. त्यानुसार उदावंत हे कासारे फाटा येथील दत्तात्रय शिर्के याच्या जत्रा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते.

कर्जुले हर्या घाटात त्या शिक्षकाचा अपघात नव्हे तर खून
आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे सुरु करा

या दरम्यान उदावंत यांच्याकडे जास्त रोकड आणि सोन्याचे दागिने असल्याचे अनेकांनी पाहिले होते. जेवण आटोपून उदावंत हे दुचाकीवरून निघाल्यानंतर दत्तात्रय शिर्के व त्याच्या सोबतच्या एकाने चार चाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला आणि एका वळणावर त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. उदावंत हे खाली पडताच या दोघांनी त्यांच्याकडील ऐवज ताब्यात घेतला आणि तेथून पळ काढला. काहीवेळाने हे दोघेही तेथे आले आणि अपघातग्रस्ताला मदत करीत असल्याचे नाटक केले.

कर्जुले हर्या घाटात त्या शिक्षकाचा अपघात नव्हे तर खून
शिक्षण विभागाच्या नऊ कर्मचार्‍यांवर ठपका

प्रवाश्याच्या जागृतेने गुन्हा उघड

उदावंत यांच्या मोटारसायकल पाठोपाठ येत असणार्‍या खासगी आराम बसमधील चालका शेजारी बसलेले नरेंद्र दगडू केदार (रा. नवी मुंबई, मुळ रा. भांडगाव, ता. पारनेर) यांनी हा खून होतांना प्रत्यक्ष पाहिला. नेकसोन कंपनीची गाडी उदावंत यांच्या मोटरसायकलचा बर्‍याच वेळ पाठलाग करत असल्याचे तसेच मोटरसायकलला धडक देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. उदावंत यांनी या धडका चुकविल्या मात्र घाटात या गाडीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. केदार यांनी लगेच याबाबत आपत्कालीन क्रमांक 1012 वरून ही माहिती पोलीसांना दिली. यानंत सुत्र हालून संशयित जेरबंद झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com