शिक्षणाचा दर्जा वाढवणे गरजेचे- आ. डॉ. तांबे

शिक्षणाचा दर्जा वाढवणे गरजेचे- आ. डॉ. तांबे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिक्षणाचे जागतिकीकरण करून शिक्षणाचा दर्जा वाढवणे गरजेचे आहे. शिक्षक व शिक्षणाबद्दल कोणत्याही सरकारने उदासीन न राहता दर्जेदार शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

आ. डॉ. तांबे श्रीरामपूर तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता बेलापूर शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणपत मुथा, उपाध्यक्ष अशोक साळुंके, सचिव अ‍ॅड. शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेश खटोड, रविंद्र खटोड, शेखर डावरे, अरुण नाईक, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, श्रीराम कुंभार, दत्तात्रय पुजारी, नवनाथ कुताळ, गोपाल जोशी, वैभव कुर्हे, गणेश गुंजाळ, शंकर शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, दर्जेदार शिक्षणाकडे आपण लक्ष दिले तरच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. मात्र आपल्याकडे उदासीनपणे पाहिले जाते. शासनाने वेतन, वेतनेतर अनुदान नियमितपणे दिले पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. सर्व पदवीधरांचे प्रश्न आपण सातत्याने मांडत आलो आहोत. फक्त शिक्षण दिले म्हणजे सरकारची जबाबदारी संपत नाही. त्यांना उद्योग, रोजगार, नोकर्‍याही उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यासाठी नेमके धोरण आखले गेले पाहिजे.

प्रास्तविक सचिव अ‍ॅड. शरद सोमाणी यांनी केले तर आभार बापूसाहेब पुजारी यांनी मानले. दरम्यान, आ. डॉ. तांबे यांनी तालुक्यातील शिक्षकांशी समक्ष भेटून संवाद साधला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com