अहमदनगर|Ahmedagar

रेखा जरे हत्याकांडातील पसार मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी झाले आहे.

पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर आज निर्णय दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

या वॉरंटमुळे पसार बोठे याच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांना या वॉरंटमुळे बोठे याला राज्यात व अन्य राज्यात पकडणे शक्य होणार आहे.

काय आहे स्टॅंडिंग वॉरंट?

न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला,त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात.