जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बोरा, पितळे, गुगळे व कटारिया यांची निवड

जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बोरा, पितळे, गुगळे व कटारिया यांची निवड

अहमदनगर l प्रतिनिधी

ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नगरमधील चौघांची निवड झाली आहे. ईश्वर अशोक बोरा, किशोर शांतीलाल पितळे, विजय कुंतीलाल गुगळे व अनिल रायचंद कटारिया यांचा त्यात समावेश आहे. जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदमल छल्लानी यांनी ही नियुक्ती केली.

नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा २९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे, अशी माहिती जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक अशोक (बाबूशेठ) बोरा यांनी दिली. जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नगरमधील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर अशोक बोरा, विनायकनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष किशोर शांतीलाल पितळे, अहमदनगर जितोचे उपाध्यक्ष विजय कुंतीलाल गुगळे, महावीरनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल रायचंद कटारिया यांची नियुक्ती झाली आहे.

जैन कॉन्फरन्सचे देशभरात जवळपास ७५ हजार सभासद आहेत. राष्ट्रीय स्तरावर ५ झोन असून नगरमधील चौघांची दक्षिण झोनमधून कार्यकारिणीवर निवड झाली आहे. यासाठी आचार्य भगवंत पूज्य शिवमुनीजी म.सा. यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले आहे. साधूसंतांचे विहारधाम, शैक्षणिक तसेच मानवसेवेच्या कार्यात जैन कॉन्फरन्स जीवन प्रकाश योजनेतून योगदान देत असल्याचे अशोक (बाबूशेठ) बोरा यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com