राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परिक्षेत ईशान परभाणेचे घवघवीत यश
सार्वमत

राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परिक्षेत ईशान परभाणेचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्यातून दरवर्षी केवळ दोनच विद्यार्थी निवडले जातात.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परिक्षेत नगरमधील ईशान निखिल परभाणे हा विद्यार्थी पात्र ठरला असून, देशात त्याने चौदावा क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र राज्यातून दरवर्षी केवळ दोनच विद्यार्थी निवडले जातात. त्यात ईशानची निवड झाल्याचे नगरमधील कर्नल परब स्कुलचे संचालक कर्नल दिलीप परब यांनी सांगितले.

ईशान कर्नल परब स्कुलचा विद्यार्थी असून, त्याने डिसेंबर 2019 मध्ये ही परिक्षा दिली होती. या परिक्षेत त्यास 305 गुण मिळाले असून, पात्र ठरलेला तो महाराष्ट्रातील दुसरा विद्यार्थी आहे. राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजसाठी राज्यातून दरवर्षी केवळ दोनच विद्यार्थ्यांची निवड होते. राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज हे केंद्र सरकराचे श्रेणी-अ संस्था आहे. 1922 साली या संस्थेची स्थापना झाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेतून भारतीय लष्करातील अधिकारी घडविण्याचे काम होते.

दर सहा महिन्यांतून या कॉलेजसाठी निवड प्रक्रीया राबविली जाते. त्यातून देशात केवळ 25 विद्यार्थी निवडले जातात. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या दोन विद्यार्थ्यांचा कोटा दिलेला आहे. त्यात या वर्षी ईशानची निवड झाली. ईशान हा येथील निखिल लाईट हाऊस व सनी इलेक्‍ट्रीकल्सचे संचालक तथा अहमदनगर फटाका असोसिएशनचे उपाध्यक्ष निखिल व तृप्ती परभाणे यांचा मुलगा आहे. त्यास कर्नल दिलीप परब, गीता परब, रिकी परब यांच्यासह पुण्यातील विवेक बल ऍकॅडमीचे संचालक डॉ. रश्‍मी कुलकर्णी व राजेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com