राहुरीत इस्त्रीच्या दुकानाला आग

राहुरीत इस्त्रीच्या दुकानाला आग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील क्रांतीचौक परिसरात असलेल्या इस्त्रीच्या दुकानाला काल पहाटेच्या दरम्यान आग लागून दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महेश शिंदे यांचे राहुरी शहरातील क्रांतीचौक परिसरात इस्त्रीचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. दि. 6 जून रोजी संध्याकाळी महेश शिंदे हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. मध्यरात्री दुकानाला आग लागली. पहाटे चार वाजे दरम्यान इस्त्रीच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे काही लोकांनी पाहिले.

आग लागल्याचे समजल्यावर महेश शिंदे यांनी ताबडतोब दुकानाकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गिर्‍हाईकाचे कपडे, फर्निचर व इतर काही सामान पूर्णपणे जळून खाक झाले. कामगार तलाठी रवींद्र बाचकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आग निश्चित कोणत्या कारणामुळे लागली? हे समजू शकले नाही. या घटनेत महेश शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com