आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

कोतवाली पोलिसांची कारवाई
आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आयपीएल क्रिकेट मॅचवर (IPL Cricket Match) सट्टा (Betting) खेळविणार्‍यास कोतवाली पोलिसांनी जेरबंद (Kotwali Police Station) केले आहे. शहरातील पिरशहा खुंट येथे पोलिसांनी शनिवारी रात्री छापा (Police Raid) टाकून कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अभय रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली असून, नदीम बाबासाहब शेख (वय 27, पिरशाह खुंट, डावरे गल्ली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. राजलक्ष्मी स्टेशनर्सजवळ जुना कापड बाजार रोडवर पिरशहा खुंट येथे एक व्यक्ती आयपीएल क्रिकेट (IPL Cricket) करीता मोबाईल फोनद्वारे लोकांकडून पैसे घेवून त्यांना मोबाईल फोनवर (Mobile Phone) आयडी व पासवर्ड देत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार कदम, गणेश धीत्रे, सलिम शेख, अतुल काजळे यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी नदीम शेख हा सट्टा खेळवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून 15 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Related Stories

No stories found.