आयपीएल सट्टा लावणार्‍यास पकडले

चास शिवारात एलसीबीची कारवाई
आयपीएल सट्टा लावणार्‍यास पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आयपीएल सट्टा (IPL Betting) लावणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर कैलास सपकाळ (रा. आगरकर मळा, अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. त्याचा साथीदार साजित पठाण (रा. घोडेगाव ता. नगर) हा पसार झाला आहे. त्यांच्या दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांनी फिर्याद दिली आहे. सागर सपकाळकडून एक मोबाईल ताब्यात घेतला आहे.

सागर सपकाळ हा फलके फार्मच्या शेजारी चास शिवारात झाडाखाली बसून सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर सट्टा लावित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी, संदीप पवार, सचिन आडबल यांच्या पथकाने गुरूवारी रात्री बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

सपकाळ हा आयपीएल क्रिकेट सामन्याच्या हारजितीवर खेळाडूंचे रन्स व विकेट यावर मोबाईल फोन वर क्रिकेट बिटींग नावाचा जुगार साजित पठाण याच्या सांगण्यावरून त्याचे अर्थिक फायद्याकरिता खेळताना व खेळविला जात असल्याचे सपकाळ याने पोलिसांना सांगितले.

Related Stories

No stories found.