श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवारातून अवैधरित्या चोरून वाळूची वाहतूक कणारे टक, ट्रॅक्टर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पकडून अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई सुरू केली आहे. असून सोमवार दि. 27 रोजी चोरून वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर, ट्रक पोलिसांनी पकडले आहेत. यात पोलिसांनी 2 लाख 9 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि. 27 रोजी रात्री 3.30 च्या सुमारास तालुक्यातील नायगाव गावच्या शिवारात निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि अशोक लेलंड कंपनीचा मालवाहू ट्रक यामधून शासकीय वाळू विनापरवाना भरून, चोरून वाहतूक करताना आढळून आले आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसांनी 8 लाख रुपये किंमतीचा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि त्याच्या पाठीमागे लावलेली लाल रंगाची पिवळा पट्टा असलेली ट्रॉली, 4 लाख 3 हजार रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा माल वाहतूक ट्रक क्र. एमएच 17 बीवाय 8558 आणि या दोन्ही गाड्यांमध्ये एकूण 9 हजार रू. किंमतीची दीड ब्रास वाळू असा एकूण 12 लाख 9 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वारे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर व ट्रक वाहनाच्या चालक व मालकांविरूद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15, 3, भादंवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि. ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.