सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा समाजासमोर एक नवा आदर्श - आ. विखे

सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा समाजासमोर एक नवा आदर्श - आ. विखे

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

दत्तनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे मित्रमंडळ व मैत्री ग्रुपच्यावतीने सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा आयाजित करून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.

दत्तनगर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात झालेल्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या विवाह सोहळ्यात सर्व जातीधर्माच्या सुमारे दहा जोडपे विवाहबद्ध झाले. विवाह सोहळ्यात सुमारे पाच ते सहा हजार लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. तसेच विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना संयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. विवाहादरम्यान सर्व जोडप्यांची सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

आ. विखे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून करोनासारख्या महामारीमुळे सर्व घटकातील लोक संकटात सापडले होते. यामध्ये काही कुटुंबातील कर्तेपुरुष मृत्युमुखी पडले, अशा परिस्थितीत माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे व त्यांच्या कुंटुबियांनी दत्तनगर व परिसरातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन अन्नदान करून सहभाग घेतला. तसेच मोफत कोविड सेंटर उभारून कोविडग्रस्तांना बरे केले. शिंदे कुंटुंबाचा आदर्श घेवून इतर गावातील लोक संकटकाळी धावून आले. या दरम्यान आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे विवाह अडकले होते. परंतू नानासाहेब शिंदे मित्रमंडळ व मैत्री ग्रुपने हा सामुदायिक विवाह घडवून आणला. त्यात अनेक जोडपे विवाहबद्ध झाले ही कौतुकास्पद बाब आहे.

विवाह विधीसाठी ख्रिश्चन धर्मगुरु रेव्ह. फादर अ‍ॅण्ड्रयू जाधव, बौद्ध धर्मगुरू भन्ते करुणानंद, हिंदु धर्मगुरु नंदु देशपांडे यांनी पौरोहित्य केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, मुळा प्रवराचे संचालक आंबादास पा. ढोकचौळे, जि. प. सदस्य शरद नवले, विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती संगिताताई शिंदे, दिलिप नागरे, राजेद्र आदिक, गणेश मुदगुले, सिद्धार्थ मुरकुटे, तहसिलदार प्रशांत पाटील, दत्तात्रय सानप, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबासाहेब दिघे, जि. प. सदस्य संदिप लहारे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय प्रमुख भिमाभाऊ बागुल, अतिरिक्त सिव्हील सर्जन डॉ. वसंत जमधडे, दत्तनगरचे सरपंच सुनिल शिरसाठ, रांजणखोलचे सरपंच चांगदेव ढोकचौळे, खंडाळ्याचे सरपंच अशोकराव पवार, एकलहरेचे सरपंच अनीसभाई जहागिरदार, शंतनु फोफसे, अभिजित कुदळे, पोलीस पाटील कृष्णा अभंग, राजु गायकवाड, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन प्रेमचंद कुंकुलोळ, पत्रकार लालमहंमद जहागीरदार, रविंद्र गायकवाड, बाळासाहेब विघे, जनार्दन खाजेकर, अरुण बागुल, सागर भोसले, शरद भणगे, प्रदिप गायकवाड, दिलिप त्रिभुवन, बाळासाहेब ढोकचौळे, अशोक बोरगे, बाबासाहेब कटारनवरे, बाबासाहेब दुशिंग, बापु शिंदे, संजय थोरात आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन रविंद्र गायकवाड यांनी केले. पी. एस. निकम यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com