जिल्हा बँकेच्या सेवकांसाठी ५० लाखांचे विमा कवच

चेअरमन सिताराम पाटील गायकर यांची माहिती
जिल्हा बँकेच्या सेवकांसाठी ५० लाखांचे विमा कवच

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत असून यामुळे जिवन जगत असतांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. सद्याचे वातावरण पहाता असुरक्षित जीवन झाले असून कौटुंबिक जबाबदारी घेत असतांना ताणतणावसह कामकाज करावे लागते. भविष्यात करोना सारखे काही संकटे येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून बँकेकडून ग्राहकांना सेवा देतांना बँक कर्मचाऱ्यांना तणाव मुक्त होण्याचे दृष्टीने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकच्या सेवा काळात कोणत्याही प्रकारच्या कारणास्तव सेवकास मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना रूपये ५० लाख रक्कम मिळण्याच्या दृष्टीने बँकेने कर्मचाऱ्यांचा विमा घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ, ज्येष्ट संचालक व माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

राज्यात सहकारी चळवळीमध्ये काम करत असतांना नगर जिल्हा सहकारी बँक ग्रामिण भागाच्या विकासासाठी नेहमीच अग्रगण्य राहीली असुन बँकेने शेती व शेती पुरक व्यवसायासाठी फार मोठे जिल्हयात काम केले असुन शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावणेचे कार्य केले आहे. हे काम करत असतांना बँकेचा विकासाचाही आलेख त्याच प्रमाणे सातत्याने चढता राहीला आहे. बँकेच्या या जडणघडणीच्या कार्यात बँकेचे सभासद, पुरोगामी विचाराचे संचालक मंडळ याच बरोबर बँकेच्या सेवकांचाही मोठा वाटा असल्याने व त्यांनी निर्भिडपणे बँकेचे काम करण्याच्या दृष्टीने बँकेच्या संचालक मंडळाने स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा कोविड-१९ चा रूपये ५ लाखाचा विमा पुर्वीच घेतला असुन रू.५० लाखाचा टर्म इन्शुरन्स भारतीय एक्सा कंपनी यांचेकडून नविन घेतलेला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी मोठया प्रमाणावर पिक कर्ज वाटप केलेले असुन चालु हंगामात उद्दिष्टापेक्षाही बँकेने जास्त पिक कर्ज वाटप केलेले आहे. राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस रू.१३८१/- कोटीची रक्कम प्राप्त झाली असुन ती रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा झालेली आहे. ही रक्कम राज्यातील इतर जिल्हयापेक्षा आपल्या जिल्ह्यात सर्वात मोठया प्रमाणात आल्याची माहीती बँकेचे ज्येष्ठ संचालक कर्डिले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्यात बँक नेहमीच उत्कृष्ट काम करत असुन बँक शेतकऱ्यांना रु.३ लाखापर्यतचे पिक कर्ज शुन्य टक्के व्याज दराने उपलब्ध करत असुन शेतकऱ्यांसाठी बँकेने वेळोवेळी अनेक चांगले निर्णय घेतलेले असल्याची असल्याची माहिती शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com