माजी नगरसेविकेला शिवीगाळ

तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा
माजी नगरसेविकेला शिवीगाळ

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

मागील भांडणाच्या कारणातून माजी नगरसेविका सारिका भूतकर (रा. भूतकरवाडी) यांना शिवीगाळ करत त्यांचे पती हनुमंत भूतकर यांना तलवार दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विकी उर्फ सुरज राजू कांबळे (रा. भूतकरवाडी), अनिल घोरपडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भिंगारदिवे मळा, भूतकरवाडी) आणि अनोळखी दोन इसमांचा समावेश आहे.

हनुमंत भूतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मी घरात असताना घराबाहेर विकी उर्फ सुरज राजू कांबळे, अनिल घोरपडे आणि इतर दोन अनोळखी इसम आले. आरोपींनी घरासमोर उभे राहून तुम्ही आमच्यावर केस करता का?, असे म्हणून मला व माझी पत्नी सारिका भुतकर हिस शिवीगाळ करून मला तलवार दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com