वांबोरी ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ

वांबोरी ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ

राहुरी (प्रतिनिधी) -

वांबोरीच्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू असताना काही समाजकंटकांनी या लसीकरण केंद्रामध्ये घुसून काल दि.14 मे रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास डॉ. पाठक यांना अरेरावीची भाषा वापरल्यामुळे व दमदाटी केल्याने या ठिकाणी काम करणार्‍या सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांनी काम बंद करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये ग्रामस्थांना लसीकरण सुरू असताना या ठिकाणी ग्रामस्थ व महिला सकाळपासूनच उपस्थित असतात. त्यांना लस मिळावी म्हणून डॉक्टर व त्यांचा सर्व पथक योग्य नियोजन करत असताना या नियोजनामध्ये आपला वशिला लागणार नाही. हे या समाजकंटकांना कळताच त्यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दवाखान्यामध्ये घुसून डॉक्टरांना उलटसुलट प्रश्‍न विचारू लागले. डॉक्टर त्यांना योग्य उत्तर देत होते. परंतु त्यांचा राग अनावर झाला आणि सर्व पथकासमोर डॉक्टरांना अरेरावीची भाषा वापरून त्यांना दमदाटी करण्यात आली. तुम्ही या ठिकाणी कसे काम करता? आम्ही सांगतो त्याच नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे.

यावेळी डॉ. पाठक यांनी ताबडतोब वांबोरी पोलीस स्टेशनला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या समाजकंटकांना पोलीस ठाण्यात बोलावल्याचे समजते. वांबोरी हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव असून याठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टर व त्यांचे पथक रात्रंदिवस काम हे काम करीत आहेत. सध्या सर्व कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. या घटनेची ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com