मोदींच्या फोटोचा अवमान, भाजपाने दिला 'हा' इशारा...

मोदींच्या फोटोचा अवमान, भाजपाने दिला 'हा' इशारा...

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

नगर तालुका पंचायत समितीच्या (Nagar Panchayat Samiti) आवारात करोना लसीकरण (Corona vaccination) जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या फलकवरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो फाडून छेडछाड व विटंबना करणार्‍या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयात तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा (BJP) नगर (Ahmednagar) तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या फोटोशी झालेल्या छेडछाडीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून हा फलक बदलण्याचे कष्ट घेत नाही. गटविकास अधिकार्‍यांनी 10-15 दिवसांपूर्वी कल्पना देऊन देखील त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर असणार्‍या व्यक्तीची किमत नसेल तर या अधिकार्‍यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? हे सर्व जाणीवपूर्वक केलेले कृत्य असून या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भाजपा नगर तालुका भाजपतर्फे (Nagar BJP) पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कोकाटे यांनी निवेदनाद्वारे दिला.

यावेळी निषेध व्यक्त करताना पंचायत समिती सदस्य दिपक कार्ले, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, दशमी गव्हाचेसरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग, बाप्पूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बाप्पूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com