इंस्टाग्रामवर युवतीची बदनामी करणारा नातेवाईक अटकेत

सायबर पोलिसांची कारवाई || कर्जत तालुक्यातील घटना
इंस्टाग्रामवर युवतीची बदनामी करणारा नातेवाईक अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवतीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून सदर अकाऊंटवरून तिला अश्लिल मेसेज व व्हिडीओ पाठविणार्‍याला येथील सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो पीडित युवतीचा नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील एका युवतीच्या नावे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. सदर अकाऊंटवरून युवतीला अश्लिल मेसेज व व्हिडीओ पाठविले. ते मेसेज व व्हिडीओ पाहून पीडित युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. पीडितीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

यासंदर्भात पीडित युवतीने 15 ऑक्टोबर, 2022 रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व त्यांच्या पथकाने केला. तपासादरम्यान सदरचे अकाऊंट पीडित युवतीच्या नातेवाईकामधील एकाने तयार केेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com