कोव्हिड सेंटरची महसूलमंत्री ना.थोरातांकडून पाहणी
सार्वमत

कोव्हिड सेंटरची महसूलमंत्री ना.थोरातांकडून पाहणी

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे 300 बेडसह अद्यावत कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संगमनेर Sangamner येथील वसंत लॉन्स येथे 300 बेडसह अद्यावत कोव्हिड सेंटर Covid Center सुरु करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी पाहणी केली.

करोनाचा Corona शिरकाव ग्रामीण भागात होतो आहे, हे चिंताजनक आहे. परंतू प्रत्येकाने शासनाचे नियम पाळले तर आपण करोनाला रोखू शकतो. तालुक्यातील संकटाच्या वेळी अमृत उद्योग समूह कायम मदतीसाठी उभा राहिला असून कारखान्याच्यावतीने केलेली प्रशस्त 300 बेडची अद्यावत सुविधा अत्यंत चांगली आहे. करोना संकटाशी आपण सर्वजण मिळून सामना करु या, नागरिकांनी घाबरुन न जाता गर्दी व समारंभ टाळावेत, मास्कचा Mask वापर करावा, सोशल डिस्टन्सचे Social Distancing पालन करावे असे आवाहन यावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी केले.

यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, संचालक रोहीदास पवार, दादासाहेब कुटे, गोरख कुटे, प्रांताधिकारी शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदि उपस्थित होते.

वसंत लॉन्स येथे थोरात कारखान्याच्या वतीने 300 सुसज बेड, फॅन, गादी, बेडशिट, जेवणाची व्यवस्था, स्वच्छ जागा, औषधौपचाराच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये 200 बेड हे पुरुषांसाठी तर स्वतंत्र कक्षात महिलांसाठी 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com