श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

श्रीरामपूर | प्रतिनिधी

डॉ. आंबेडकर जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) साजरी केली नाही म्हणून अज्ञात व्यक्तींनी येथील उपप्रादेशिक परिवहन (Shrirampur Sub-Regional Transport Officer) कार्यालयाचे डेप्युटी आरटीओ अधिकारी बच्छाव यांच्या अंगावर शाई फेकून निषेध केला. आज सकाळी ही घटना श्रीरामपूर येथे घडली.

१४ एप्रिल रोजी देशभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही. याचा निषेध म्हणून अज्ञात कार्यकर्त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले. तेथे डेप्युटी अधीकारी बच्छाव चर्चेसाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली.

या घटनेने तेथे एकच गोंधळ उडाला. येथील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला नेले. अज्ञान कार्यकर्ते तेथून निघून गेले. या घटनेचा निषेध म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बच्छाव यांना मेडिकलसाठी घेऊन गेले. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Related Stories

No stories found.