शिर्डीत आढळला जखमी खंड्या पक्षी

वनविभागाचे कर्मचारी मात्र नॉट रिचेबल
शिर्डीत आढळला जखमी खंड्या पक्षी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

शिर्डी शहरातील पानमळा परिसरातील एका घरासमोरील गवतात रंगीबेरंगी सुंदर मनमोहक खंड्या पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला.

हा पक्षी आढळून आला त्याठिकाणी राहाणारे विलास लासुरे कुटुंबीयांनी याबाबत राहाता व कोपरगाव तालुक्यातील वनविभाग खात्याला याची माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र सदरील कर्मचारी नाँटरिचेबल असल्याने खुप प्रयत्नानंतर तालुक्या कार्यरत असणाऱ्या वनविभाग कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांची कार्यतत्परता धिम्या गतीने दाखवली. तब्बल 12 तासांनंतर वन कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी यर्त या पक्षाची पाहणी केली आणी उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्नालयात हलविण्यात आले.

शिर्डी शहरातील पानमळा परिसरात दुर्मिळ खंड्या पक्षी जखमी अवस्थेत विलास लासुरे यांच्या परिवारातील सदस्यांना मिळून आला. यावेळी त्या पक्षाच्या जवळ गेले असता हा पक्षी गंभीर जखमी असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. तातडीनेे जखमी पक्षाला उचलून व्यवस्थित ठिकाणी ठेवत त्याला धान्य व पाणी दिले. या पक्षाचे खाद्य छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक असल्याने त्यांच्या समोर ठेवलेले कुठलेही खाद्य त्याने खाल्ले नाही. हा पक्षी पानथळीवर राहणारा असून पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्षाचे वैशिष्ट्र्े आहे.

वनविभागाचे कर्मचारी नागरिकांचे फोन उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. रात्री अपरात्री जर शिकार करणारा प्राणी परिसरात आढळून आला तर फोन कुणाला करारचे..? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com