वारसदार शेतकरी आज हरेगाव व्यवस्थापकांकडे सुपूर्द करणार अर्ज
सार्वमत

वारसदार शेतकरी आज हरेगाव व्यवस्थापकांकडे सुपूर्द करणार अर्ज

Arvind Arkhade

माळवाडगांव |वार्ताहर|Malvadgav

शेती महामंडळाने ई टेंडर करार पध्दतीने जमिनी देताना आमच्या हक्काच्या वडीलोपार्जीत आकारी पडीक जमिनींचा समावेश करता कामा नये. या मागणीसह पुन्हा प्रत्ये्क वारसदार नव्याने जमिन मागणी अर्ज 9 गावातील वारसदार शेतकरी कोविड -19 नियमांचे पालन करत हरिगांव मळा स्थावर व्यवस्थापक यांच्याकडे आज सोमवार दि.17 ऑगष्ट रोजी सुपूर्द करण्याचा निर्णय शनिवारी 15 ऑगष्टला माळवाडगांव येथील आकारी पडीक शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला

15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माळवाडगाव येथे भवानी देवी मंदिरात ज्येष्ठ आकारी पडीक कार्यकर्ते दगडू बाजीराव आसने यांच्या अध्यक्षतेखाली 9 गावातील आकारी पडीक वारसदार शेतकर्‍यांची बैठक संपन्न झाली. कोविड - 19 नियमांचे पालन करण्यात आलेल्या या बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाऊसाहेब बांद्रे, गिरीधर आसने, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, अ‍ॅड. तुषार आदिक, वसंतराव मुठे, सोपानराव नाईक आदींची भाषणे झाली.

सर्व वक्त्यांचे भाषणात एकच सुरू दिसून आला. आकारी पडीक शेतकर्‍यांनी राजकिय गट तट विसरून या प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. सताधारी असो वा विरोधी पक्षनेते आपल्या कामासाठी दोघांकडे जाण्याची वेळ आल्यास संकोच न बाळगता जायचे.

राजकारणी नेतेमंडळी शिवाय प्रश्न सुटणार नाही; परंतु या संघटनेत राजकारण होता कामा नये. राजकारण झाल्यास वारसदार शेतकरी आपणास कदापी माफ करणार नाही. असे एक ना अनेक विचार बहुतांश भाषणातून ऐकावयास मिळाले

या बैठकीस पांडूरंग पवार, बबनराव मुठे,सोपानराव नाईक, दिलीप गलांडे,वसंतराव मुठे, संपतराव मुठे,भिकचंद मुठे, शिवाजी रूपटक्के, छबू रूपटक्के, बाळासाहेब रूपटक्के, राजेन्द्र आदिक, सुनिल आदिक, भास्कर शिंदे, डॉ दादासाहेब आदिक, भाऊराव आदिक, दगडू बा.आसने, सुरेश डाखे, लक्ष्मण चिडे, आप्पासाहेब काळे, नानासाहेब आसने बाळासाहेब द.आसने, जोसेफ गायकवाड, रावसाहेब आढाव, सुभाष मोरे, बाबासाहेब आसने, दिलीप हुरूळे, शालनताई झुराळे, कांताबाई आसने, ताराबाई आसने, बबनराव वेताळ, दत्तात्रय वेताळ, गोरखनाथ वेताळ, बाळासाहेब वेताळ आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com