आरोग्य विभागाने सतर्क रहावे - आमदार काळे

आमदार आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात इन्फ्लूएंझा या विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत असून त्याचे लोन नगर जिल्ह्यात देखील पसरले आहे. 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे या विषाणूचा कोपरगाव तालुक्यात प्रसार होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

करोनाची डोकेदुखी कमी झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती निर्धास्त होऊन मोकळा श्वास घेऊ लागले होते. मात्र नव्या विषाणूच्या संसर्गाने काहीशी चिंता वाढवली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वैश्विक करोना महामारीचा आपण यशस्वीपणे मुकाबला करून या महामारीला हद्दपार केले होते. त्याच धर्तीवर आरोग्य विभागाला आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत करू व या नव्या इन्फ्लूएंझा या विषाणूला देखील पळवून लावू.

आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तातडीने संपर्क करावा. सर्व अडचणी तात्काळ दूर केल्या जातील. मात्र नागरिकांचे आरोग्य जपा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी केल्या असून स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com