कटिंग-दाढीला महागाईची झळ; आता 'इतके' पैसे मोजावे लागणार

कटिंग-दाढीला महागाईची झळ; आता 'इतके' पैसे मोजावे लागणार

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा सलून चालक-मालक संघटनेच्या बैठकीत कटिंग व दाढीच्या दरात १५ मे २०२२ पासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे सलूनमध्ये कटिंगसाठी १३० रूपये तर दाढीसाठी ७० रुपये मोजावे लागतील.

अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सलूनच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, त्याचबरोबर सलून मटेरिअलचे वाढत चाललेले दर यामुळे सलून चालक मेटाकुटीस आले आहेत. सलून निगडित मटेरियल, विज बिल अशा अनेक महागाईच्या संकटाशी तोंडमिळवणी करण्यासाठी व तसेच वाढत असलेली महागाई व सलूनचे दर यात ताळमेळ बसत नसल्याकारणामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार झालेल्या बैठकीत कटिंगसाठी १३० रूपये व दाढीसाठी ७० रुपये दर येत्या १५ मे २०२२पासून लागू करण्यात येणार आहेत. सलून व्यावसायिकांनी एक सारखे दर आकारावेत व ग्राहकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले.

या बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील वाघमारे, जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, महाराष्ट्र कार्यकारिणीचे विलास मदने, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकास मदने, अहमदनगर जिल्हा सलूम चालूक-मालक संघटनेचे अध्यक्ष जनार्दन वाघ, उपाध्यक्ष सत्तार अली, अजय कदम, सदस्य संजय मदने, शरद दळवी किशोर मोरे, विशाल मदने, विनोद साळुंके, अरुण वाघ, नवनाथ मदने, जनार्दन शिंदे, शहाजी कदम, शिवाजी दळवी अनिल कदम आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.