महागाई विरोधात काँग्रेसचे उद्या श्रीरामपुरात आंदोलन

महागाई विरोधात काँग्रेसचे उद्या श्रीरामपुरात आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्र सरकारच्या व महागाईच्या निषेधार्थ महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. लहू कानडे यांच्या माध्यमातून उद्या सोमवार दि. 4 रोजी सकाळी 8.30 वा. यशोधन कार्यालय, बेलापूर रोड या ठिकाणापासून लाँग मार्च (मोर्चा) काढण्यात येणार आहे.

देशात खाद्य पदार्थापासून, पेट्रोल, डिझेल, गॅस व खते, बी-बियाणे आदी वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून गोरगरीब सामान्य माणसांचे जगणेे अवघड झाले आहे. या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशपातळीवर महागाई मुक्त भारत हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महागाई दूर करण्यासाठी मोदी सरकारवर दबाव आणून केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुध्द हे आंदोलन केले जात आहे.

या मोर्चामध्ये नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मोटारसायकलसह सहभागी व्हावे, असे आवाहन आ. कानडे यांच्यावतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पा. नाईक यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.