वडाळा बहिरोबा गावात करोनाचा शिरकाव
सार्वमत

वडाळा बहिरोबा गावात करोनाचा शिरकाव

गाव दुपारी ३ नंतर बंद

Nilesh Jadhav

खरवंडी | वार्ताहर | Kharavandi

अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात करोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे पहिला करोना बाधीत आढळला आहे. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

या रुग्णास नेवासा येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचे स्वब तपासणीसाठी घेतले जात असून त्यांना विलागिकरण कक्षात हलवले जात आहे. वडाळ्यात पहिला करोना बाधित रुग्ण सापडल्याने आज दुपारी तीन नंतर गाव बंद करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

घोडेगाव येथील रुग्णाचे निधन

मागील आठवड्यात घोडेगाव येथील एका रुग्णाचा रिपोर्ट खाजगी लॅब मधून पाॅझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नगरला उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणाही झाली होती मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com