अकोले तहसील कार्यालयात करोनाचा शिरकाव
सार्वमत

अकोले तहसील कार्यालयात करोनाचा शिरकाव

तालुक्यातील करोना बाधितांची एकूण संंख्या ७९ वर

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यासह धुमाळवाडी रोडवरील ५१ वर्षीय महिला व धुमाळवाडी येथील १५ वर्षीय मुलगा तर तालुक्यातील माणिका ओझर येथील ६५ वर्षीय वृद्ध आणि ३५ वर्षीय पुरूष अशा पाच जणांचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

आज पाच अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने तालुक्यातील करोना रुग्णांची एकूण संंख्या ७९ झाली आहे. त्यापैकी ४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ०३ जणांचा मृत्यू झाला असून २९ जणांवर उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com