रांजणगावात मका पिकावर नाकतोडे सद्दृश्य किडीचा प्रादुर्भाव
सार्वमत

रांजणगावात मका पिकावर नाकतोडे सद्दृश्य किडीचा प्रादुर्भाव

परिसरातील मका उत्पादक शेतकरी चिंतेत

Nilesh Jadhav

रांजणगाव देशमुख | वार्ताहर | Ranjangaon Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील एका शेतक-याची मका नाकतोडे सदृश्य किडीने पुर्णता खाऊन घेतली असुन मकाचे फक्त सरकाळेच शिल्लक राहीली आहे. यामुळे परिसरातील शेतक-यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय उदावंत य़ांच्या शेतातील मका पिकाची नाकतोडे सदृश्य किडीने केलेली नासाडी
विजय उदावंत य़ांच्या शेतातील मका पिकाची नाकतोडे सदृश्य किडीने केलेली नासाडी

अगोदरच अनेक वर्ष चांगला पाऊस नाही. शेतीमालाला चांगला भाव नाही. यावर्षी जरा वेळेत आणि चांगला पाऊस झाला काही ठिकाणी जास्त पावासामुळे पिकांची आधिच नासाडी होत आहे. त्यात आता नाकतोडे सदृश्य किडी संर्पुण पिकच खाऊन घेत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विजय उदावंत य़ांच्या शेतातील मका पिकाची नाकतोडे सदृश्य किडीने केलेली नासाडी
विजय उदावंत य़ांच्या शेतातील मका पिकाची नाकतोडे सदृश्य किडीने केलेली नासाडी

रांजणगाव देशमुख येथील विजय उदावंत यांच्या शेतातील मका दोन दिवसात नाकतोडे सदृश्य किडीने संपुर्ण खाऊन टाकली आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी मका पिकाला लष्करी अळीने मोठा त्रास दिला. यावर्षी नाकतोडेंनी पिके जमीनदोस्त करण्यास सुरुवात केल्याने अधिच अडचणीत असलेले शेतकरी अधिक अडचणीत येणार आहे. अनेक शेतक-यांना काही पिकांची यावर्षी बियाणामुळे दुबार पेरणीचा सामाना करावा लागला त्यात आता नविन अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विजय उदावंत य़ांच्या शेतातील मका पिकाची नाकतोडे सदृश्य किडीने केलेली नासाडी
विजय उदावंत य़ांच्या शेतातील मका पिकाची नाकतोडे सदृश्य किडीने केलेली नासाडी

दमट वातावरणात हे नाकतोडे अंडी घालतात. शेतक-यांनी नाकतोडे आढळलेल्या पिकावर क्लोरोपायरीफॅास ५० टक्के ईसीची फवारणी करावी. या फवारणीमुळे या नाकतोड्यांचा संपुर्णता नाश होईल. शेजारील शेतक-यांनीही फवारणी करावी.

अशोक आढाव (तालुका कृषी आधिकारी, कोपरगाव)

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com