राहात्यात भुयारी गटारीच्या निकृष्ट कामामुळे उपनगराध्यक्ष ठेकेदारावर संतापले

राहात्यात भुयारी गटारीच्या निकृष्ट कामामुळे उपनगराध्यक्ष ठेकेदारावर संतापले

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) शहरात सध्या कोट्यवधी रुपयांच्या भुयारी गटारींचे काम (Underground sewer work) सुरू आहे. प्रभाग क्रमांक पाच मधील संत सेना गल्लीत देखील भुयारी गटारीचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम करत असताना निकृष्ट दर्जाचे (inferior quality) काम होत असल्याने उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे (Deputy Mayor Rajendra Pathare) यांनी आक्षेप घेत काम थांबवण्यास सांगितले. कामात सुधारणा करूनच काम करावे, अशी मागणी पठारे यांनी केली आहे.

भुयारी गटारीचे काम करताना सिमेंट नळ्या टाकण्याअगोदर त्याखाली मुरुमाचा थर टाकून पिचिंग करणे गरजेचे असताना ठेकेदार केवळ नळ्या टाकून ते बुजवत आहेत. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केला. पठारे यांनी स्वतः कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला (Contractor) त्याठिकाणी बोलावून जाब विचारला. यावेळी चूक झाल्याचे मान्य करत ठेकेदाराने टाकलेल्या नळ्या कामगारांना तातडीने काढून घेण्यास सांगितले. त्यानंतर मुरूम आणून आधी मुरुमाचे पिचिंग करून भुयारी गटारीच्या नळ्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे (Deputy Mayor Rajendra Pathare) यांनी शहरात इतर ठिकाणी देखील सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे.

शहरात भुयारी गटारीचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च होत आहे. मात्र ठेकेदार आणि कामावर देखरेख करणारी कंपनी कामात हलगर्जीपणा करत आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बोलावले असता त्यांनी मिटींगमध्ये असल्याचे सांगितले. देखरेखीसाठी कंपनीला मोबदला दिला जातो मात्र ते आपल्या कामात कसूर करत आहेत. निकृष्ठ काम करणारे ठेकेदार तसेच देखरेख करणारी कंपनी यांची बिले कामाची पाहणी करूनच अदा करावे. सदर निकृष्ठ कामाची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे करणार आहे.

- राजेंद्र पठारे, उपनगराध्यक्ष

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com