करोनाची तिसरी लाट रूग्णांना लुटणार्‍यांसाठी!

इंदोरीकर महाराज : भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये हरिनाम सप्ताह
करोनाची तिसरी लाट रूग्णांना लुटणार्‍यांसाठी!

सुपा |वार्ताहर| Supa

करोनाची लाट (Corona wave) ही गरिबांना लुटणार्‍यांसाठी येणार आहे. करोनामुळे (Covid 19) माणसं भांबावली, त्यांनी डॉक्टरची (Doctor) पदवी पाहिली नाही, तज्ज्ञ पाहिला नाही आणि डॉक्टरांनीही रुग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रुग्णांना लुटलं (Robbed patients) त्यांचे वाटोळे होणार. गरिबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल हे सांगता येणार नाही, असे सांगत हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indorikar Maharaj) यांनी करोना रुग्णांकडून (Covid 19 patient) भरमसाठ बिले उकळणार्‍या डॉक्टरांवर जोरदार प्रहार केला.

आ. निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या मार्गदर्शनाखालील भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिरात (Sharad Pawar at Arogya Mandir) श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये इंदोरीकर (Indorikar Maharaj) यांनी कीर्तनसेवा अर्पण केली. त्यावेळी त्यांनी आ. लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. देव हा विशिष्ट लोकांकडून विशिष्ट काम करू घेतो. जी दगडं घाव सहन करतात तिच देवाच्या मूर्तीसाठी वापरली जातात.

भाळवणीच्या आरोग्य मंदिरातून (Bhalwani Arogya Mandir) एक माणूस बरा होऊन गेला तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे. गरिबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही, देवपण मात्र आल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत हॉस्पिटल (Hospital) विकत घेणारी माणसं होती. महिनाभर डॉक्टर (Doctor) ठेवणारी लोकं होती. रुग्णाच्या वजनाइतके पैसे देणारी लोकं होती. पण ते रुग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहुणे, संपत्ती, ऐश्वर्य कामाला येत नाही. मात्र, चांगले कर्म वाया जात नाही. पुण्याला थोडा उशिर आहे, पण फळ निश्चित आहे.

लंके 288 आमदारांमधील बच्चन!

शरीर थकले तरी मन थकू देऊ नका, आज प्रत्येकाला आधाराची गरज आहे. भाळवणीचे आरोग्य मंदीर नसते तर गोरगरीब जनतेचे हाल झाले असते. अनेकांनी दागीने मोडून रुग्णालयांची बिले भरली. जे रुग्ण येथे उपचार घेउन गेले त्या रुग्णांच्या नातेवाईकांचेही कल्याण झाले. समाजासाठी झटणारी माणसे फार कमी असून 288 आमदारांमध्ये समाजासाठी झटणारे आ. लंके हे राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचे इंदोरीकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com