आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून साकूर व मालदाड योजनांना मान्यता

साकूरसाठी 20 कोटी 39 लाख; मालदाडला 18 कोटी 71 लाख रुपये
आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून साकूर व मालदाड योजनांना मान्यता

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर व मालदाड येथील नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने संगमनेर तालुक्यातील विविध गावांच्या विकासासाठी मोठा निधी मिळविला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांच्या कामाला दिलेली गती व त्यासाठी मिळविलेला मोठा निधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे कालव्यांची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. आता नव्याने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे व जि.प.सदस्या सौ. मीराताई शेटे आणि शंकरराव खेमनर यांच्या पाठपुराव्यातून साकूर व मालदाड गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यामध्ये साकूर पाणी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटी 39 लाख 62 हजार रुपये इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास अटी व शर्तींची पूर्तता करण्यास अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर मालदाड येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 18 कोटी 71 लाख 98 हजार रुपयांचा अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांच्या कुटुंबांना घरापर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे.

या योजनेसाठी साकूर व मालदाडच्या विविध पदाधिकार्‍यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. या योजनांचा पाठपुरावा करणे कामी माजी प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, सौ.मीराताई शेटे, शंकर खेमनर यांचे सहकार्य लाभले असून या योजनांच्या मंजुरीबद्दल साकूर व मालदाड गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com