
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्याचे (Akole Taluka) भूषण, महाराष्ट्रातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (Nivruti Maharaj Deshmukh) यांना डॉक्टरांनी प्रकृती अस्वस्थेच्या (Helth Discomfort) कारणामुळे दि. 23 मे ते 30 मे 2022 या काळात पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे या कालावधीत त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द (Scheduled Event Canceled) करण्यात आले असल्याची माहिती निवृत्ती महाराज देशमुख (Nivruti Maharaj Deshmukh) यांनी दिली आहे.
या कालावधीत इच्छा असूनही येऊ शकत नसल्याने कार्यक्रमांच्या आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी दिलगिरी व्यक्त केली. व वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील असे सांगितले.