मी लस घेतली नाही, घेणारही नाही

मी लस घेतली नाही, घेणारही नाही

नाशिक | Nashik

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी करोना लसीबाबत केलेल्या विधानाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी करोना परिस्थिती व लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. 14 वर्षे राम वनवासात गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिला नाही, अस वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं आहे.

यापूर्वीही इंदोरीकर महाराज किर्तनातून केलेल्या एका वक्तव्यामुळं वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. इंदोरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com